गळोरगी तलावातील आ.कल्याणशेट्टी यांच्या हस्ते जलपूजन

Galoragi Talav1

। अक्कलकोट : प्रतिनिधी
गळोरगी (ता.अक्कलकोट) येथील 2.08 दशलक्ष घनमीटर पाणी साठवण तलाव तुडूंब भरुन वाहु लागल्याने त्याचे जलपुजन रविवारी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
अक्कलकोट शहरास पाणीपुरवठा करणारी हिळ्ळी, हालचिंचोळी, सांगवी, कुरनूर असे चार जलस्त्रोत असतानाही अक्कलकोट शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी अनेकवेळा अडचणी निर्माण झाले होते. यावेळी गळोरगी येथील साठवण तलावाने अक्कलकोट शहरवासियांचे तहान भागविले होते. गतवर्षी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार’ या अभियांनांतर्गत गळोरगी तलावातील सुमारे 3 लाख घनमिटर गाळ काढण्यात आले होते. यंदाच्या पावसाळ्यात शंभर टक्के भरलेला आहे. यामुळे गळोरगी पंचक्रोशीसह अक्कलकोट शहराचे पाण्याचे प्रश्न मिटलेला आहे. त्या जलाशयाचे जलपूजन आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. या जलपूजन प्रसंगी अनुलोम भाग जनसेवक राजकुमार झिंगाडे, अक्कलकोट भाजप शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, बसवंतराव कलशेट्टी, काशीनाथ प्रचंडे, सरपंच चंद्रशेखर आंदोडगी, वाहिदपाशा शेख, आजूरे, संतोष आळगी, धोंडप्पा बनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.याचवेळी आमदार कल्याणशेट्टी व इतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. गळोरगी तलाव मागे कमी पावसाने पूर्ण कोरडा पडला होता त्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार या अभियान अंतर्गत अनुलोम संस्था व राज्य शासन यांच्या वतीने तसेच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सूचनेनुसार व प्रयत्नातुन अनुलोम संस्थेकडून जेसीबी व पोकलेन देण्यात आले होते तर शासनाच्या कडून डिझेल देण्यात आले होते तर शेतकरी वर्गांकडून स्वतःच्या वाहनाने प्रचंड गाळ काढण्यात आला होता सुमारे वीस किलोमीटर पर्यंत नागरिक गाळ नेऊन टाकले त्यामुळे तीन लाख घनमीटर गाळ काढण्यात आला होता.

About Author