खेडगी महाविद्यालयात 63 जणांचे रक्तदान

khedgi

। अक्कलकोट: प्रतिनिधी
उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या आदेशानुसार, अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक उपाध्यक्ष कै. चन्नबसप्पा खेडगी यांच्या जयंती निमित्त, महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सी. बी. खेडगी चॅरिटेबल ट्रस्ट व सी. बी. खेडगी महाविद्यालय परिवाराच्या वतीने एन. एस. एस. आणि एन. सी. सी. विभागाच्या च्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात 63 जणांनी रक्तदान करत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
प्रारंभी अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शिवशरण खेडगी यांच्या हस्ते शिबिराचे उदघाट्न करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. गुरुलिंगप्पा धबाले, डॉ. किसन झिपरे पर्यवेक्षिका प्रा. वैदेही वैद्य उपस्थित होते. शिबिराचे समन्वयक डॉ. शिवराया अडवितोट यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महाविद्यालय परिवारातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला.
डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे डॉ. दिलीप बनसोडे, डॉ. हरिश्चंद्र गलियाल, दीपा कुलकर्णी, रुपाली आगलावे, संगीता मेंथे, राहुल मस्के यांनी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. शरणप्पा अचलेर यांनी केले तर प्रा. दयानंद कोरे यांनी आभार मानले.
यावेळी डॉ. यावेळी उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय फुलारी, पर्यवेक्षिका वैदेही वैद्य, प्रा. विलासराव अंधारे, डॉ. गणपतराव कलशेट्टी, डॉ. चौडप्पा कांबळे, डॉ. किशोर थोरे, डॉ. इफ्तेकार खैरदी, एन. सी. सी. अधिकारी लेफ्टनंट
डॉ. भैरप्पा कोणदे, डॉ. गुरुसिद्धय्या स्वामी, प्रा. निलेश भरमशेट्टी, प्रा. विजया कोन्हाळी, प्रा. श्रीकांत जिद्दीमनी, डॉ. अशोक माळगे, प्रा. प्रकाश सुरवसे उपस्थित होते.

About Author