कै.महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ जेऊर येथे 111 जणांचे रक्तदान

Jeur

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथे गुरुवारी श्री काशीलिंग देवस्थान ट्रस्ट जेऊर व स्नेहलोक युथ फाऊंडेशन अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या रक्तदान शिबिरात 111 जणांनी रक्तदान केले.
माजी आमदार कै. महादेव पाटील यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधत कोरोना काळात सध्या जाणवत असलेल्या रक्त तुटवडा पार्श्वभूमीवर सदर सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आणि यावेळी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कै.महादेवराव काशिराया पाटील यांच्या चतुर्थ पुण्यतिथी निमित्त त्यांचे फोटो पूजन करुन दीपप्रज्वलनाने रक्तदान शिबिरास प्रारंभ करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा यावेळी वृक्षांची रोपे देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागनाथ सुरवसे हे होते. यावेळी सद्गुरु पांडुरंग महाराज, जिल्हा परिषद सदस्य, मल्लिकार्जुन पाटील, जेऊरचे सरपंच शोभा सुनील जाधव, महांतेश्वर पाटील, शिवाजीराव कलमदाणे, अंदप्पा कापसे, काशीनाथ कवठे, सूर्यकांत चौधरी, इरप्पा कळवंत, डॉ.नागार्जुन जिंकले, शिवराज स्वामी, मल्लिनाथ करपे, काशीराया काका पाटील, काशिनाथ कापसे, सुनील जाधव, सुरेश सोनार, फकिरय्या स्वामी, मल्लिनाथ मणूरे, महादेव फुलारी, इरण्णा कणमुसे, अरविंद सोनार, राजकुमार अमोगी, सिद्धाराम कालिबत्ते, अंबाराया कनोजी, काशिनाथ कडगंची, शिवराज बोरीकरजगी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सर्व रक्तदात्यांना भेट वस्तू व प्रमाणपत्र देण्यात आले. सदर रक्तदान शिबिर अश्विनी ग्रामीण रक्तपेढी यांच्या सहकार्याने राबविण्यात आले. यावेळी प्रास्ताविक मल्लिकार्जुन पाटील यांनी केले तर यावेळी पांडुरंग महाराज यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शंकर अजगोंडे यांनी केले तर आभार काशीराया काका पाटील यांनी मानले.

About Author