केंद्र सरकारच्या कृषी विधेयकविरोधी स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

। सलगर : प्रतिनिधी
केंद्र सरकारचे कृषी विधेयक शेतकरी विरोधी कायदा आहे. शेतकर्यांना गुलामगिरीत ढकलणारा कायदा आहे. त्याचे दुरगामी परिणाम भोगावे लागणार आहेत. त्यामुळे लवकर भानावर या, अशी साद घालत काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी कृषी विधेयक विरोधी स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
सलगर येथे काल शुक्रवारी कृषी विधेयक मागे घेण्याविषयी स्वाक्षरी मोहिमेस सुरुवात केली. या स्वाक्षरी मोहिमेची सुरूवात मैंदर्गी येथून गुरूवारी करण्यात आले.
शेतकरी विरोधी कायदा कसल्याही परिस्थितीत रद्द करण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित शेतकरी सह्या मोहिमेत सलगर गावातील शेतकरी बांधवाना पाठिंबा देण्याचे आवाहन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण समितीचे सभापती स्वाती शटगार, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी, महिला तालुका अध्यक्ष मंगल पाटील, शहराध्यक्ष भिमाशंकर कापसे, सातलिंग शटगार, सरपंच सुरेखा गुंडरगी, सोसायटीचे चेअरमन संजय डोंगराजे, ग्रा.पं. सदस्य काशिनाथ कुंभार, माजी सरपंच अशोक पाटील, सातलिंग गुंडरगी, चिंचल भगळे, सिद्धाराम धसाडे, भीमाशंकर जमादार, राजकुमार जमादार, माजी विरोधी पक्षनेते शिवानंद बिराजदार, बसवराज चिकमळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.