कृषी कायदा शेतकर्‍यांसाठी दिलासादायक : भारतीय किसान संघ

Kisaan Sangh

। अक्कलकोट : प्रतिनिधी
हमी भाव, खरेदीदारांच्या नावाची पोर्टलवर नोंदणी, शेतकर्‍याचे न्याय निवडण्यासाठी न्यायालय स्थापना, जीवनावश्यक वस्तू अधिनिमामध्ये साठवणुकीसाठी व्यापारी व कंपनी यांना दिली जाणारी संदिग्ध सवलतासह चार दुरस्त्या केंद्र सरकारला सुचविल्या असून उर्विरत नवीन कायद्याला भारतीय किसान संघाचा पाठिंबा असल्याचे प्रांत संघटना मंत्री चंदन पाटील यांनी जाहीर केले.
नव्याने लागू करण्यात आलेल्या कृषी कायदा संदर्भात शेतकर्‍यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी भारतीय किसान संघ अक्कलकोट तालुका वतीने किसान जनजागृती अभियानाचे आयोजन श्री वटवृक्ष स्वामी समर्थ भक्त निवास हॉलमध्ये आयोजित केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब शहाणे-पाटील सोलापूर जिल्हा अध्यक्ष नागप्पा सिंदगी तालुका अध्यक्ष बसवराज बिराजदार तालुका संघटन मंत्री विरभद्र मठपती, हन्नुरचे सोपान निकते, उपाध्यक्ष अनिल बिराजदार प्रमुख उस्थितीमध्ये होते.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, सध्या देशभर नवीन कृषी कायदा बाबत शेतकर्‍यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाली आहे. 75 एर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर केंद्र सरकारच्या अजेंड्यावर कृषी हा विषय आल्याचे दिसून येत आहे. शेतकर्‍यासाठी ही बाब मोठा दिलासादायक आहे. तथापि केंद्र सरकारने कृषी सुधारणा बाबत केलेल्या तीन कायद्याबाबत भारतीय किसान संघाने प्रारंभापासून आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे. या कायद्यातील 75 टक्के भाग हा योग्य व आवश्यक आहे. तथापि 25 टक्के मसुदामध्ये कांहीं महत्वाचा सुधारणा होणे गरजेचे आहे. म्हणून किसान संघाचे कार्यकर्ते सद्या देशातील खेडोपाडी जावून शेतकर्‍यांचा बैठक, मेळावे, सभा यांच्या माध्यमातून नवीन कृषी कायद्याबाबत वास्तव्य पूर्ण माहिती शेकर्‍यांपर्यंत देवून जनजागरण करीत आहेत. तसेच या नवीन कायदेबाबत शेतकर्‍यांचा मानस सुध्दा जाणून घेतला जात आहे.यानुसार शेतकरी हिताचे बदल करून घेण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करण्याची भूमिका सद्या भारतीय किसान संघ करीत असल्याचे यावेळी चंदन पाटील यांनी सांगितले. या प्रसंगी नागणसुरचे गंगाधर म्हेत्रे, सातन दुधनीचे महादेवराव पाटील, अक्ककोटचे गुरुनाथ गुड्डद, संतोष वगाले, प्रसाद हारकुड, राजकुमार तेली,शिवशंकर स्वामी बोरगावचे राजेंद्र सुरापुरे, बोरी उमरगेचे नागेंद्र बिराजदार आदी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

About Author