काठी रोल

Kathi roll

साहित्य : * गव्हाचे पीठ 2-3 वाट़या, चिरलेला कोबी, गाजर, कांद्याची पात, सिमला मिरची आणि वाटाणा, लाल तिखट, मीठ, चाट मसाला, तीन चमचे तेल.
कृती : * गाजर, वाटाणा, सिमला मिरची, कांदा या भाज्या मीठ, लाल तिखट आणि चाट मसाला घालून शिजवाव्यात. * सर्वात शेवटी कोबी घालून एक वाफ द्यावी. * नंतर कांद्याची पात घालावी. * गव्हाच्या पिठात मीठ, तेल घालून मळून घ्यावे. * फुलक्याप्रमाणे लाटावेत. * त्यावर भाज्यांचे सारण एका सरळ रेषेत ठेवून घट्ट गुंडाळावे. * सारण बाहेर येऊ नये म्हणून दोन्ही बाजू बंद कराव्यात.* हा रोल कमी तेलात तळावा. * तुकडे करून किंवा अख्खाच चटणी किंवा दह़्याबरोबर वाढावा.

About Author