कटारे परिवाराकडून मणूर येथे महिलांना साड्या व फराळाचे वाटप

। अक्कलकोट : प्रतिनिधी
मणुर (ता.अफझलपूर) येथील श्री यलमा देवस्थान येथे कै. निर्मला अप्पाराव कटारे व नलिनी विश्वनाथ कटारे यांच्या समरणार्थ दिवाळी निमित्त महिलांना साड्या व दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच श्री यलम्मा देवस्थानास 2100 रुपयांची देणगी देण्यात आली.
याप्रसंगी सुनिल कटारे यांच्या हस्ते व भाजपा तालुका अध्यक्ष तथा माजी पंचायत समितीचे सदस्य मोतीराम राठोड, पंचायत समिती सदस्य राजेंद्र बंदीछोडे, हिळ्ळीचे शिवानंद बाके, बसवंत कोळी, नितीन कटारे या मान्यवरांच्या हस्ते हे दिवाळी फराळाचे व साड्यांचे वाटप करण्यात आले,.
दरवर्षी सुनील कटारे हे शैक्षणिक साहित्य व दिवाळी फराळ तसेच रुग्णाना फळे वाटप करत असतात. त्यांनी या वर्षी ही परंपरेनुसार महिलांना आपली बहीण व काकू यांच्या समरणार्थ मंदिर समितीला देणगी देऊन महिलांना साड्या व फराळ वाटप केले.