आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त हन्नूर येथे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Dada - new

। हन्नूर : प्रतिनिधी
अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य टेनिस बॉल, क्रिकेट स्पर्धा तथा आमदार चषक आयोजन करण्यात आले असल्याची माहिती लॉर्ड बुद्धा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष संतोष बाळशंकर यांनी दिली आहे. ही स्पर्धा 5 नोव्हेंबर 2020 रोजी उद्घाटन आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या हस्ते होणार असून या स्पर्धेसाठी 10 संघाला निमंत्रण दिले आहे. प्रत्येकी संघास 10000 रूपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 51000/-हन्नुर उपसरपंच सागर कल्याणशेट्टी यांच्या कडुन द्वितीय 31000/- संदिप बाळशंकर डीबीएन अध्यक्ष व डॉ. चंद्रकांत फुलारी यांच्या कडुन, तिसरा पारितोषिक 21000/-
प्रा गौतम बाळशंकर तालुका समन्वयक नेहरू युवा केंद्र अक्कलकोट व महेश कलशेट्टी यांच्या कडुन ठेवण्यात आले आहे. इतर पारितोषिक उत्कुष्ठ फलंदाज, गोलंदाज, मॅन ऑफ दि मॅच, मॅन ऑफ दि सिरीज, हॉट्रीक चौकार षटकार, संघनायक, आदी साठी 55000/-पारतोषिक ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर संघातील खेळाडुंना टी. शर्ट , समितीच्या वतीने देण्यात येणारा आहे. आदी संघांनी सहभाग होऊन ही स्पर्धा यशस्वी असे आवाहन लॉड बुद्धा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष संतोष बाळशंकर व राम पारतनाळे यांनी केले आहे.

About Author