आपतग्रस्तांना मदत जाहीर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : प्रविण दरेकर

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील नदीकाठच्या गावचे जनजीवन विस्कळीत व या परिसरातील शेकडो हेक्टर क्षेत्रातील शेतकर्यांचे उभा पिक वाहून गेल्याने शंभर टक्के नुकसान झालेला आहे. तेंव्हा महाविकास आघाडी सरकारला मोठ्या प्रमाणात मदत जाहीर करण्यास भाग पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले.
ते अक्कलकोट तालुक्यात बोरी व हरणा नदीकाठच्या ग्रामस्थांना व शेतकर्यांना महापूराचा मोठा फटका बसलेला आहे. अनेकांचे घर-दार, संसार, संसारोपयोगी साहित्य, गुरे-ढोरे, शेळ्या-मेंढ्या, शेती, शेतकर्यांचे उभे पिक वाहून गेल्याने उघड्यावर पडले आहेत. त्या परिस्थितीचे पाहणी करण्यासाठी आलेले होते. याप्रसंगी दरेकर बोलत होते.
यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, खा.डॉ.जयसिध्देश्वर महास्वामीजी, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राम सातपुते, भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, नगरसेवक महेश हिंडोळे, जि.प.सदस्य आनंद तानवडे, रिपाइं ता.अध्यक्ष अविनाश मडिखांबे, प्रांताधिकारी दिपक शिंदे, तहसिलदार अंजली मरोड, गटविकास अधिकारी महादेव कोळी आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान संगोगी (ब) येथील लक्ष्मीपुत्र हौदे, अय्यप्पा हौदे, शिवराया रायगोंडा, पुजारी यांच्या घरात पाणी शिरुन घरातील संसारोपयोगी साहित्य तसेच खंडप्पा करकी यांचे पाच जनावरे वाहून गेले आहेत तर भवानराया बिराजदार यांचे चार एकर ऊस, 18 शेळ्या व संपूर्ण घरच पाण्यात वाहून गेल्याने यांचे दरेकरांनी आस्थेने विचारपूस करुन भवानराया बिराजदार यांना पंचवीस हजार रुपयेचा बंद पाकिट दिले. हे माझ्याकडून दिले असून शासनाकडून मोठी मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करतो असे सांगून सांत्वन केले. याप्रसंगी संगोगी (ब) व आंदेवाडी (ज) येथील नदीकाठच्या शेतकर्यांचे शेतीचे पाहणी करुन शेतकर्यांचे सांत्वन केले. स्वस्थ रहा व सुरक्षित रहा असे आवाहनही प्रसंगी केले. यावेळी ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाच्या कर्मचारी, अधिकारी व ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळेच संगोगी (ब) व आंदेवाडी (ज) गावावर संकट ओढवला असल्याचे ग्रामस्थांतून सांगत होते.
यावेळी भाजपा महिला आघाडी ता.अध्यक्षा सुरेखा होळीकट्टी, जि.प.सदस्य अणप्पा बाराचारी, दुधनीचे नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे, पं.स.सदस्य राजेंद्र बंदीछोडे, गुंडप्पा पोमाजी, कय्युम पिरजारदे, उद्योगपती चंद्रकांत इंगळे, कांतु धनशेट्टी, परमेश्वर यादवाड, दयानंद उंबरजे, बसवंत कलशेट्टी, सुनिल गवंडी, सातलिंगप्पा परमशेट्टी, किरण केसुर, दयानंद बमनळ्ळी, अनिल पाटील, राजु चौगुले, माजी सरपंच प्रदिप पाटील, राजशेखर चौधरी, अरविंद ममनाबाद, जयशेखर पाटील, बाळा शिंदे, ऋतुराज राठोड, राहुल रुही, प्रकाश पाटील, चंद्रकांत दसले, धनंजय गाढवे, नागराज कुंभार आदी उपस्थित होतेे.
आंदेवाडी (ज), संगोगी (ब) येथे पावसाळा आला की, गाव आणि शेत वाहून जाण्यासारखा नदीला पाणी येतो. मात्र उन्हाळ्यात प्यायला पाणी मिळत नाही, हे आमचे दुर्दैव आहे. आम्हाला आजपर्यंत कोण वाली भेटलेला नाही. आता आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यारुपाने भेटले आहेत, लवकरच पूर्ण करुन देती अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
बोरी रामपूर येथे 13 ऑक्टोंबर 2020 रोजी आलेल्या महापूराच्या पाण्याने गावाला वेढा घातला. गावातील सर्व नागरिक स्थलांतरित झाले होते. मात्र पाण्याचा ओघ भरपूर वाढल्याने गौराबाई व संगीता बिराजदार पाण्यात अडकून पडलेल्या होत्या. रात्रीची वेळ होती. त्यांना बाहेर पडता आले नाही. गावात कुणीतरी अडकल्याचा संशय घेवून पाच फूट पाण्यातून वाट काढत दोन महिलांना दक्षिण पोलिस ठाण्याचे सहा.पो.नि.गणेश मस्के यांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी विशेष कौतुक केले, असेच आपल्या कर्तव्यातून सामाजिक कार्य करीत रहा, काही अडचणी आल्यास आम्ही आपल्या पाठिशी आहोत असे दरेकर यांनी सांगितले.