अभिनव शिवलिंगेश्वर महास्वामींजी यांच्यावतीने संसार उपयोगीय साहित्याचे वाटप

। अक्कलकोट : प्रतिनिधी
क्वटीदु तनगे..! बच्चीटीदु पररीगे कुडल संगम देवा..!! म्हणजे दान दिलेल आपल्यासाठी झाकून ठेवलेल धन परक्यासाठी आहे असे जगदगुरू बसवेश्वर महास्वामींजी यांनी आपल्या वचनात केले होते. या उक्तीप्रमाणे कर्नाटक राज्यातील मादनहिप्परगा येथील मठाधिपती श्री.म.नि.प्र. अभिनव शिवलिंग महास्वामींजी यांनी कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील पुरग्रस्तांना संसार उपयोगी साहित्य वाटताना बोलत होते. ते महाराष्ट्र, कर्नाटक हद्दीतील नदीकाठच्या गावांतील नागरिकांना महापूराचा फटका बसलेला आहे. अशा उघड्यावर आलेल्या सर्व सामान्य नागरिकांना महिनाभर पुरेल एतका किराणा माल साबन, टूथपेष्ट, टॉवेल, कोलगेट, साडी व एक ड्रेस व संसार उपयोगी साहित्य प्रत्येकी एक किट असे नऊसे आपतग्रस्तांना कर्नाटक राज्यातील जिल्हा कलबुर्गी, ता. आळंद मादनहिप्परगा येथील शिवलिंगेश्वर विरक्त मठ मादनहिप्परगाचे मठाधिश श्री.म.नि.प्र. अभिनव शिवलिंग महास्वामींजी यांनी वाटप करतान बोलत होते.
पुढे बोलताना श्री.म.नि.प्र. अभिनव शिवलिंग महास्वामींजी म्हणाले, पैसे आणि पद, प्रतिष्ठा किती कमवला आणि काय मिळवला, यापेक्षा आपण मिळवलेल्या धनातून गोरगरीब व निराश्रीतांना दान करणे हे परंम पुण्याचे काम असल्याचे सांगून दोन्ही राज्याच्या सिमाभागातील विविध पक्षाच्या राजकिय नेत्यांनी फोटो शेषन करण्यापेक्षा शक्य असलेल्याींन प्रत्यक्षात दान,धर्म करा असे आवाहन प्रसंगी अभिनव महास्वामींजी यांनी केले. यामध्ये महाराष्ट्र हद्दीतील संगोगी (ब), रुध्देवाडी, आंदेवाडी (ज), चिंचोळी (मै), आदी गावातील अपातग्रस्तांना तर कर्नाटकातील अफजलपूर तालुक्यातील इंचगेरी, बनहट्टी, हवलगा, देसाई कल्लूर, स्वन्न, बंकलगी तांडा, गौर (के), दिकसंगीसह सहाशे आपतग्रस्तांना असे एकूण नऊसे जणांना संसार उपयोगी किराणा साहित्याचे वाटप मादन हिप्परगा येथील शिवलिंगेश्वर मठाच्या वतीने मठाधिपती श्री.म.नि.प्र. अभिनव शिवलिंग महास्वामींजी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील अभिनव महास्वामींजीचे भक्तांनी योग आपतग्रस्तांना संसार उपयोगी साहित्य व किरणा माल पोचविण्यासाठी परिश्रम घेतले.