अन्नछत्र मंडळाची महाप्रसाद सेवा बंद मात्र सामाजिक कार्य अविरत

राज्य, देश-विदेशात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, श्रीक्षेत्र अक्कलकोटचे नाव न्यासाने स्वामी भक्तांसाठी अन्नदानाचे स्वामी कार्य भक्तप्रिय तर आहेच, न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सात महिन्यापासून कोवीड-19 मुळे महाप्रसाद सेवा जरी बंद असली तरी सामाजिक कार्य अविरत सुरुच आहे.
न्यासाचे अन्नदानाचे स्वामीकार्य कोरोना विषाणूच्या राष्ट्रीय आपत्तीमुळे दि.15 मार्च पासून गेल्या सात महिन्यापासून शासनाच्या आदेशानुसार तात्पुरत्या स्वरुपात स्थगित केले आहे. जरी अन्नदानाचे कार्य थांबले असले तरी न्यासाच्या पोटनियमानुसार सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक, पर्यावरणपूरक, जलसंधारण, महिला सक्षमीकरण, वृक्षारोपण, संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन मदत कार्य सुरु आहेत.
या महामारीवर मात करणेकरिता वैद्यकीय साधनसामुग्री, स्वच्छता विषयक साधनसामुग्रीची मदत हे न्यास सातत्याने करीत आहेत.
या बरोबरच न्यासाच्यावतीने स्वामीभक्त, हितचिंतक यांच्या सुख-दुखात नेहमीच अग्रेसर आहे. या सामाजिक कार्यात न्यासाकडून वाढदिवस, शुभसंदेश, दु:खद घटनेत सात्वंन पत्र, विविध निवडी यांना न्यासाच्या पत्राव्दारे संदेश दिले जात आहेत.
न्यासाच्या या अविरत सुरु असलेल्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
अशा कोवीड-19 मध्ये न्यास शासनास सर्वतोपरी सहकार्य करीत आहे. नेहमीच धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या या न्यासाकडून सध्य परिस्थितीमुळे सामाजिक कार्यात आघाडी घेतलेला आहे.