अन्नछत्र मंडळाकडून गानसम्राज्ञी लतादीदींच्या स्वास्थ्यासाठी महानैवेद्य व आरती

Samarth

। अक्कलकोट : प्रतिनिधी
भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांच्या ‘घरातील माणसं’ म्हणून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले असा उल्लेखच दस्तुरखुद्द गानसम्राज्ञी यांनीच केलेला असल्याने मंगेशकर कुटूंबियांच्या सुख,दु:खात सहभागी असणारे भोसले परिवार अन्नछत्र मंडळाकडून दीदींच्या स्वास्थ्यासाठी व त्यांना आनंददायी, सुखमय जीवनासाठी रविवारी विजयादशमी (दसरा) श्री स्वामी समर्थांना महानैवेद्य व आरती प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळ धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीयरित्या कार्यरत आहे. न्यासाच्या जडणघडणीत भारतरत्न लतादीदी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. मंगेशकर व भोसले यांचे अतुट नाते हे तर ‘श्रीं’चीच इच्छा, मंगेशकर कुटूंबियातील प्रत्येक व्यक्ती ही अन्नछत्र मंडळ व भोसले परिवाराबाबत कायमचं खुशालीबाबतची भ्रमणध्वनीवर चर्चा असते.
रविवारी विजयादशमी (दसरा) निमित्त ‘श्रीं’ना लतादीदींच्या स्वास्थ्यासाठी व आनंददायी, सुखमय जीवनासाठी महानैवेद्य व आरती याबरोबरच मंगेशकर कुटूंबियातील मीनाताई, आशाताई, उषाताई, पंडितजी, हृदयनाथ यांचा आशिर्वाद व आदिनाथ, आजिनाथ, राधाताई, योगीनाथ, रचनाताई यांना देखील दसरा विजयादशमीच्या शुभेच्छा देत स्नेहपूर्ण नमस्कार नम्र व भाग्यशाली जन्मेंजयराजे व अमोलराजे भोसले या पिता-पुत्रांनी व्यक्त केले आहेत.

About Author