अतिवृष्टी आणि पूरस्थिती नुकसानी पोटी 31 कोटी 10 लाखांची प्रशासनाची मागणी

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे अक्कलकोट तालुक्यातील 43 हजार 524 हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी 31 कोटी 10 लाख रुपयांची मागणी तालुका प्रशासनाने राज्य सरकारकडे केली आहे.
पंधरा दिवसापूर्वी दि.14 ते 16 ऑक्टोंबर दरम्यान अक्कलकोट तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जमीन खरडून जाणे, जमीन वाहून जाणे, माती वाहून जाणे, गाळ साचणे, यासाठीही शासनाकडून मदत दिली जाते. या बरोबरच शेत जमिनीवरील गाळ वाहुन जाणे, गाळाचा थर साचण्याचे प्रकार झालेले आहे.
या बरोबरच ग्रामीण भागात घरे देखील मोठ्या प्रमाणा पडझड झालेली आहेत. याबाबतही पंचनामे होत आलेली आहेत. तरी अशांना देखील नुकसान भरपाई मिळण्याची मागणी पुढे येत आहे.
अक्कलकोट तालुका हा अवर्षण-दुष्काळी त्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतकर्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून अद्यापही उभ्या पिकांतील पावसाचे पाणी आहे, ते तसेच असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून तालुक्यातील शेतकर्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी.
अप्पासाहेब पाटील, उपसभापती,
अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समिती