अतिवृष्टीमुळे सर्व शेतकरी व शेतमजूरांना त्वरीत मदत करण्याची मागणी

। शिरवळ : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस व अतिवृष्टीमुळे सर्व शेतकरी बांधव, शेतमजूर व ज्यांच्या घरांचे नुकसान झाले त्यांना त्वरित सरसकट मदत करण्याची मागणी केली. तसेच वागदरी जिल्हा परिषद मतदारसंघातील ममनाबान येथील स्थलांतरीत ग्रामस्थांना लोकमंगल डेअरी, कोळीबेट येथे भेट घेतली. सांगवी (खुर्द) , सांगवी (बुद्रुक), शिरशी आणि शिरवळ या गावी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली, व संबंधित विभागाच्या प्रशासन अधिकारी यांना दुरध्वनीवरून संपर्क साधुन तात्काळ मदत करण्याच्या सूचना केल्या आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसानीची पाहणी करतांना आनंद तानवडे सोबत अबुबकर शेख (सरपंच) मलकण्णा बिराजदार, भिमा पारशेट्टी, गुणवंत लवटे, सतपाल भोसले, पिंटु घाटगे, अंकुश घाटगे, राजु रेड्डी, सुरेश कोळी, राजु इंगळे, मल्लीकार्जुन घोडके, अप्पु देवकर, संगप्पा चानकोटे, राजा गंगापुर, लक्ष्यवेधी अमितकुमार कोतमिरे व तलाठी, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर व तहसिल कार्यालय, अक्कलकोट येथे समक्ष भेटून देवून भरीव मदती संदर्भात निवेदन दिले.