अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून 75 दिवसात कर्जाचा रु.1 कोटीचा टप्पा पार : मनोज निकम

Manoj Nikam

। अक्कलकोट : प्रतिनिधी
राज्यातील 36 जिल्ह्यातील 358 तालुक्यात अक्कलकोट तालुक्याने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने संचालक प्रशांत भगरे यांच्या प्रयत्नाने गेल्या 75 दिवसात कर्जाचा रु.1 कोटीचा टप्पा पार केला असून लॉकडाउन काळातही दिलसा मिळाला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष तथा शरदचंद्रजी पवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज निकम यांनी दिली आहे.
मनोज निकम म्हणाले, राज्यातल्या अन्य महामंडळापेक्षा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने विविध योजनांच्या माध्यमांतून मराठा समाजातील युवकांना स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभे राहता यावे, अशा योजना आखल्यामुळे सध्या अण्णासाहेब पाटील महामंडळाचे नाव संपूर्ण राज्यात घेतले जात आहे. या महामंडळामुळे मराठा समाजातील नवउद्योजक तयार होत असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे निकम म्हणाले.
निकम पुढे बोलताना म्हणाले, समाजातील युवकांना उद्योग व्यवसायाकरिता महामंडळाचे अध्यक्ष ना.नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष ना.संजय पवार व संचालक मंडळासह व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील व त्यांच्या टीममुळे सुलभ लाभ मिळत असून नेहमीच अवर्षण दुष्काळी अक्कलकोट तालुक्यातील समाज युवकांना न्याय मिळत आहे. लॉकडाउनमध्ये देखील महामंडळाचे सहकार्य लाभत असल्याने समाधान निकम यांनी व्यक्त केले.
या महामंडळाकडून फोटोग्राफी, किराणा दुकान, टेम्पो व्यवसाय, पोल्ट्री, दूध डेअरी, कॅसेट हाऊस, कार अ‍ॅसेसरीज, हॉटेल व्यवसाकरिता बँक ऑफ इंडिया व युनियन बँकेकडून कर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. महामंडळाची प्रकरणे होण्यासाठी सर्वच बँका ह्या सकारात्मक असून बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापक शरणप्पा पुजारी, युनियन बँकेचे व्यवस्थापक सचिन शिर्के व एचडीएफसी बँक यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.
दि.1 जून ते 29 ऑक्टोंबर पर्यंत महामंडळाने सोलापूर जिल्ह्यात 5 महिन्याच्या कालावधीत अक्कलकोट 49, बार्शी 68, करमाळा 90, माढा 195, माळशिरस 22, मंगळवेढा 4, मोहोळ 46, पंढरपूर 86, सांगोला 11, उत्तर सोलापूर 23, दक्षिण सोलापूर 5 एल.ओ.वाय देण्यात आलेले आहेत.

महामंडळाचे अध्यक्ष ना.नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष संजय पवार यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली राज्यातील मराठा समाजातील युवकांना आणखीन काही योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहेत. सन 1998 नंतर गेल्या 22 वर्षात महामंडळाच्या कामकाजात आमूलाग्र बदल झाला तो ना.पाटील व ना.पवार यांच्यामुळेच यामुळे राज्यातला मराठा समाजातील युवकांना नवउद्योजक होण्याची संधी प्राप्त होत असल्याचे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे संचालक प्रशांत भगरे यांनी सांगितले.

About Author