अक्कलकोट शहर प्रमुख योगेश पवार यांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट

yogesh pawar

। अक्कलकोट : प्रतिनिधी
साहेब, शिवसैनिक आहे, अक्कलकोट शहर प्रमुख आहे, मला आपला आशिर्वाद पाहिजे याकरिता भेट घेऊ इच्छितो असा आर्त हाक शिवसेना शहर प्रमुख योगेश पवार यांनी देताच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोडण्यास सांगितले असता जय भवानी, जय महाराष्ट्र, एकच सेना शिवसेनेचा नारा देत ना.ठाकरे यांच्या समोर जावून पवार नतमस्तक झाले अन् भेटीने आनंदाच्या अश्रूने आनंद व्दिगुणित होऊन समाधान व्यक्त केले.
सामान्य कार्यकर्त्यांपासून शिवसेनेला बळ मिळाले, आज सामाजिक, राजकीय क्षेत्रात सेनेने गेल्या दोन-अडीच शतकात घेतलेली भरारी पाहता स्थानिक स्वराज्य संस्थापासून ते राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचलेली शक्ती आहे. सेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य कार्यकर्ता हा केंद्रबिंदू मानून कार्यरत राहिले. त्यांच्या पाऊलावर पाऊल ना.उध्दव ठाकरे व पुत्र ना.आदित्य ठाकरे हे ठेवत असल्याचे पदोपदी पहायला मिळत आहे. आजही सोमवारी श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या भेटीत सगळ्यांना याची देही, याची डोळा पहायला मिळाले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ना.उध्दव ठाकरे यांच्या सोबत मोठी गर्दी होऊ नये म्हणून दक्षता घेत आपत्तीग्रस्त भेटी व अन्य कार्यक्रम आखण्यात आलेला होता.
सेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, पदाधिकारी यांना सदर दौर्‍यापासून लांब ठेवण्यात आलेले होते. मात्र अक्कलकोट शहर प्रमुख योगेश पवार हे सर्वसामान्य सेनेचा कार्यकर्ते ते शहर प्रमुख पदापर्यंत पोहोचलेले पवार यांनी अखेर ना.ठाकरे यांची भेट घेऊन समाधान मानले.
याप्रसंगी राज्याचे मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्याच्या शब्दाला होकार देणार्‍या ना.ठाकरे यांचे सर्वस्तरातूर कौतुक होत आहे.

About Author