अक्कलकोट महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

koli

। अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट शहर व तालुका मुख्य कार्यालय येथे आद्यकवी कुलगुरू महर्षी वाल्मिकी जयंती सालाबादप्रमाणे साजरी करण्यात आली. प्रतिमा पुजन समर्थ-वाल्मिकी प्रतिस्टानचे संस्थापक अध्यक्ष स्वामीनाथ लोणारी यांचे आज वाढदिवस असल्याने त्यांच्या हस्ते व आरपी कोळी, मुगळीचे प्रकाशजी जमादार यांनी एकत्रिकपणे केली यावेळी अरूणभाऊ लोणारी हे देखील उपस्थित होते. हा जयंती सोहळा कोळी महासंघाचे जिल्हा सरचिटणीस बसवराज कोळी व कोळी महासंघाचे कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार कोळी सर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला.
यावेळी कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष रूशीभाऊ लोणारी, उपाध्यक्ष उमेश करजगी, शहराध्यक्ष श्रीशैल रोडगे, कर्मचारी शिवपुरे, मल्लिकार्जुन सोमेश्वर, कोषाध्यक्ष राजकुमार कोळी , गणपती घंटे, गौरीशंकर कोळी, दत्तात्रेय अमिनभावी, सागर लोणारी, राम लोणारी, दशरथ मुलीमनी समस्त समाज बांधव उपस्थित होते. यावेळी कलहिप्परगे नुतन शाखाध्यक्ष पदी भोजप्पा कोळी यांना निवडिचे पत्र देण्यात आले.

About Author